STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

1  

Manisha Awekar

Abstract

सावित्री

सावित्री

1 min
37

आधुनिक विचारांची

स्नुषा लाभली तिजला

जुन्या विचारांची सासू

छेडे वारंवार तिला


वर्ष पहिले सणांचे

हौस खूपच सासूला

दरवेळी रजा घेणे

शक्य नव्हते सूनेला


सासू व्हायची नाराज

अशी कशी नवी पिढी

काळ काम नि वेगाचे

अवघड कोडे बाई


व्रते करी सासूबाई

तिचा नित्य नमस्कार

मनामधे खट्टू सासू

नव्यापुढे मानी हार


वटपौर्णिमेला आला

बाका प्रसंग घराला

अपघात हो मुलाला

पत्नी उशा पायथ्याला


चार दिवस अखंड

केली शर्थ प्रयत्नांची 

जीव वाचवला त्याचा

नवयुग सावित्री ती


नको कर्मकांड तिला

नको अंधश्रद्धा उरी

कर्तव्यासी मानणारी

आधुनिक ती सावित्री 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract