साथ तुझी
साथ तुझी


अनुभवले मी नवं यश
आज फक्त तुझ्याचमुळे
मिळाली नवी ओळख
फक्त तुझ्याचमुळे
सद्गुरुनी दिला जन्म
आई वडिलांनी सांभाळलं
जगाशी सामना करण्यास
तू मला शिकवलं
तुझ्या प्रेमाला नाही मोल
प्रेमळ नातं हे अनमोल
जीवापाड जपतोस मला
ठाऊक आहे माझ्या मनाला
तुझ्या प्रेमाने मला
बरंच काही शिकवले
कवयित्री आणि शेफ म्हणून
सर्वांनीच आज कौतुक केलं
संसारात या आपल्या
कमी पडू दिली नाही
उणीव मला कसलीही
भासू दिली नाहीस
हाती घेऊनी हात तुझा
बरंच पुढे चालायचं आहे
तुझ्यासवे जीवनाचा भरभरून
आस्वाद घ्यायचा आहे