साथ तुझी मला हवी
साथ तुझी मला हवी
ओढ तुझी माझ्या मनी
अशी काही जागली
तुझ्या प्रति माझी प्रीत
मला तुझी आस लागली...
दिवस रात्र तू माझ्या
या मनावर राज्य करतो
स्वप्नांत येऊन ही तूच
माझा प्रेमाने हात धरतो...
रोज तुझ्या मिठीत येण्याचे
शोधते मी वेड्यागत बहाणे
कधी भास होऊन तुझा
येतात माझ्या अंगावर शहारे
बस झाले आता हे इशारे
नको त्या खाणाखुणा
हात हाती घेऊन माझा
करुया जरा अल्लडपणा..
रोजच रोज अशी नवी
साथ तुझी मला हवी
साथ मला देशील का ?

