STORYMIRROR

archana d

Tragedy Action Crime

3  

archana d

Tragedy Action Crime

बलात्कार

बलात्कार

1 min
178

नाही संपत कधीच

स्त्रीवर होणारे अत्याचार

म्हणूनच होत आहेत

अजूनही हे बलात्कार

तरुण ललना,बालिका,म्हातारी

त्यांचा कमी पडतो प्रतिकार

वासनांध नजेरच्या कित्येकदा

त्या होतात समाजात शिकार..

कितीही स्त्री असू द्या

समाजात निष्कलंक

तरी बलात्कार होऊन

तिच्या जन्मास लागतो कलंक

पुरुषार्थ गाजवण्याची हौस

त्या नराधमास असते फार

बलात्कार झाल्यावर ही समाज

होतो दोन दिवसात गपगार..

कोल्हे,लांडगे प्राणी शेवटी ते

कमी तोडतील अंगाचे लचके

नीच मनुष्य वेशातील जनावरांना

स्त्रिया घाबरून घेतात धसके...

स्त्रीचे शरीर त्या नराधमाना

वाटते भोगायची गोष्ट

आई,बहिण, मुलगी दिसत नाही

मती होते का त्यांची भ्रष्ट...

काय म्हणावं अश्या

पुरुषी वेशातील जनावरांना

अक्षम्य गुन्ह्यानंतर योग्य शिक्षा

मिळेल का स्त्री जातीच्या गुन्हेगारांना ?..

बलात्कारानंतर पेटवतो

समाज फक्त मेणबत्ती

कटू सत्य हे की त्यामुळे

विजते कित्येक घरातील ही पणती...

नराधम पुरुषांच्या वर

आजची स्त्री कधी पडणार भारी

बलात्कार रोखू शकेल

का भविष्यात ही नारी...



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy