लग्नानंतर माझे आयुष्य
लग्नानंतर माझे आयुष्य
लग्नानंतर माझे आयुष्य
क्षणात बदलून गेले...
माझ्या नावापुढे तुझं
नावं विराजमान झाले...
राजासारखा येऊन मला
केलीस तू दिलाची राणी...
तुझ्याच प्रीती ची आता
मी गाते मंजुळ गाणी...
तुझ्या रूपात मिळालं
मला लाख मोलाचं दान..
तुझी बायको झाल्यामुळे
समाजात मला मिळतो सन्मान...
लग्नानंतर तुझ्या प्रेमाला
आला खऱ्या अर्थाने बहर...
डोळ्यांत एकमेकांच्या हरवून
सख्या जागूया सारेच प्रहर...
दुराव्याने जरी कधी आले
आपल्या दोघांत हे अंतर...
प्रेमात तुझे हट्ट पुरवणेशिवाय
नसतो रे मला गत्यंतर...
तुझा प्रत्येक हट्ट तुझ्यासारखा
असतो रे जगा वेगळा...
तुझा निरागस चेहरा पाहून
जातो माझा ही राग सगळा...
तुझ्या प्रेमभऱ्या नजरेत
दिसतो मला महासागर...
या सागरात हरवून भरेन
मी ही रोजच प्रेमाची घागर...

