मी शब्द तू गीत व्हावे
मी शब्द तू गीत व्हावे
मी शब्द तू गीत व्हावे
तू आणि मी एक व्हावे
वाहून जावे तुझ्या मिठीत
मी तुझ्यासवे हे गीत गावे
अव्यक्त भावनांना माझ्या
शब्द रुपात तू उतरावे
लपलेल्या चांदण्यानी
अधीर होऊन क्षणात मोहरावे...
रोज नव्याने यावा
प्रीतीला आपल्या बहर
आर्त मनातील त्या भावनेला
येऊदे प्रेमाची लहर...
सूर बनून छेडावी तू तार
बहरावे ते प्रेमाचे क्षण
सुखाच्या लहरीत होतील
एकरूप दोन्ही अधीर मन..
दोघांच्या श्वासात असलेले
संपेल आता ते अंतर
प्रेम गीत असेच सुरू
राहील आयुष्यभर निरंतर...

