STORYMIRROR

archana d

Action Inspirational Others

3  

archana d

Action Inspirational Others

आरोग्य हीच खरी संपत्ती

आरोग्य हीच खरी संपत्ती

1 min
157

आरोग्य स्वतःचे 

खरोखरचे असे धन..

हेळसांड करतात

तरीही लोक क्षणोक्षण..


अवेळी जेवण घेणे ,

नेहमी चांगले लागते ..

उघड्यावरचे खाऊन शरीर 

आजाराने सदा ग्रासते...


करावा निश्चय मनाचा, 

रोज योगासन करण्याचा.

जरा स्वतः त्रास करावा ,

त्यासाठी पहाटे उठण्याचा...


खाणंपिणं ज्याचे,

असते नेहमी सुंदर..

रोग त्यांच्यापासून 

होतात सारे छुमंतर..


रोजच पौष्टिक आहार 

सर्वजण आनंदाने घेऊ..

एकमेकांना कायम ,

आयुष्यात निरोगी ठेवू .


पैश्यासाठी धावणे 

जेव्हा माणसाचे थांबेल 

तेव्हा नक्की जो तो 

आरोग्य रोगमुक्त जगेल..


नैराश्याचा माणसावर 

होत असतो हल्ला ..

त्यासाठी योग्य तो ,

घ्यावा वैद्यकिय सल्ला.


जिभेचे ते चोचले 

पथ्य पाळून पुरवावे..

आरोग्य समस्या मिटवून 

दीर्घायुषी व्हावे. 


"आरोग्य जीवन हेच 

 खरी धन संपदा "

तिला जपले तर येणार नाही 

आरोग्यविषयक विपदा...


आरोग्याची केली जपणूक 

तरच हॉस्पिटल जाईल लांब...

त्यासाठी माणसा तू घरातच 

विसावा घेण्यास क्षणभर थांब...



Rate this content
Log in

Similar marathi poem from Action