माय मराठी
माय मराठी
मराठी भाषेची किती
सांगावी आम्ही महती..
महाराष्ट्राची शान गाजत
असते साऱ्याच जगती....
मराठी भाषा आहे
ही अमृताहून गोड..
या भाषेला जगी
कुठे नसेल तोड...
साऱ्या भाषांत असे
मराठी भाषा माझी देखणी..
चालत राहते अगाध
साहित्यिकांची ही लेखणी...
मराठी भाषा आहे
माझी ही मायबोली..
माझ्या सारखीच आहे
ती साधी, सरळ नि भोळी...
मराठी भाषेला लाभली,
तळपत्या तलवारीची धार...
कविता, ओळी, अभंगातून
निघतात शब्द सुमनांचेही हार..
लावणी, पोवाडे ऐकून
एकदाच भागत नाही तहान
सकल जणा जगतात म्हणती
मराठी भाषा आहेच महान...
माय मराठी भाषेचा
असे आज गौरव दिन...
बोलून ही भाषा नित्य
जपूया तिचे मातृऋण...
मराठी भाषा आहे
या महाराष्ट्राची शान
गाऊ सारेच मिळून
अभिमानाने तिचे गुणगान..
