साक्ष
साक्ष
आज काय लिहावं त्या
आकाशातील ताऱ्यावर
रात्रभर राहिलं सोबत
सकाळी सोडेल वाऱ्यावर....
रात्री रूप सोज्वळ
या जीवाला लावेल वेडं
सकाळ होण्याआधी
अंधारून जाईल रोड
ताऱ्यांना सदा असें
तिथं चांदण्यांची गर्दी
त्यांना पाहून मनातील
भाव होतं असें दर्दी
चंद्राच्या तालावर नाचून
तारे लकाकतात जणू
हर्ष उल्हासाने क्षणात
उडणे विसरती रेणू...
रेणूला मार्ग दाखवण्या
असें फुलपाखरू दक्ष
चंद्र ताऱ्यांच्या मैफलीस
असें प्रेमवेड्यांची साक्ष...

