STORYMIRROR

archana d

Action Inspirational Others

3  

archana d

Action Inspirational Others

लपलेला दरवाजा

लपलेला दरवाजा

1 min
152

मनाच्या कोपऱ्यात एक

लपलेला दरवाजा असतो....

तिथंवर आपण ठरवूनही

कधीच पोहचत नसतो....


येते जेव्हा भावनांची

ही भली मोठी विचित्र लाट...

तेव्हा होतो सुरु आपला

अंतर्मनात जाण्याचा घाट...


नाहीच सापडत तिथं

पोहोचण्याचा सहज रस्ता...

आपलं मन, शरीर कितीतरी

 पोहोचण्यासाठी खात खस्ता...


विचारांचा होतो जेव्हा

असं काही अगणित गुंता...

हरवत जातं आपले मन

आपल्याला ही न सांगता...


अंतर्मनात झाकून जेव्हा

त्रयस्थपणे आपण पाहतो...

तेव्हाच आपल्या चुका

आपण सुधारू लागतो....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action