साथ तिची
साथ तिची
जन्मोजन्मीची साथ ही
कष्ट करुनी घरी येता संगे
क्षणात देती प्याला जीवाला
गेलीस कुठे न सांगता
हुरहूर आमुच्या मनाला
कोणास न रागावणे न मारणे
कोणाचा द्वेष न करणे
अशी प्रेरणादायी तू
सप्तरंगावरी घे उधळण
गगनरुपी मनरंगी गाजिसी तू
निर्मल ममतेची घागर
त्यागरुपी संसाराचा सागर तू
मावशीपरी मायच तू
काय लिहू परी तुजवर
शब्द न सुचे मजला
लिहू तेवढे अखंडित
अशी प्रेरणादायी तू