संगीत
संगीत
1 min
357
सा रे ग म प ध नि सां
स्वरमाधुर्य धुन
सां नि ध प म ग रे सा
श्रवणीय हे जीवन
जयाचे संगम तेची
नाद गायन वादन
ऐकावे सकल जण
संगीत मन भावन
संगीत परी ज्ञान घे
बालगोपाल ऐकावे
संस्कारक्षम बनुनी
स्रुजनशील असावे
सकारात्मक सामर्थ्य
संगीत श्रवणाने हो
जीवन साथी जणू
नवपालवी फुले हो
जुने सुगंधी गायन
काळ्या मातीत मातीत
देई निर्गुण आनंद
जन्मते लोकसंगीत
मानसिक स्वास्थ लाभे
रामबाण उपाय हे
दूर पळीसी आजार
नित्य श्रवण कर हे
