सौभाग्य
सौभाग्य
हिरवा चुडा चढविला हाती
कुंकू लागे कपाळी
साथ लाभे साता जन्माची
प्रियवरा जीव जडला तुजवर
मन बावरले माझे
काय घडले विपरीत
तो मनधरणी
नाही कळला अर्धांगिनीस
भावना विवश मनी
सौभाग्य कांक्षिणी
पाझर न फुटे त्यास
पैसा मागे माहेरुन
छळ करिसी वारंवार
करपले आयुष्य
सुकले कोवळे पान
हिरवा चुडा चढविला हाती
बनला आयुष्याचा रंग बेरंग
