STORYMIRROR

Ratna Shah

Others

4  

Ratna Shah

Others

गुरु

गुरु

1 min
453

गु म्हणजे अंधकार

रु म्हणजे नाहिसा

करीसी तु आमुचा

अंधकार नाहिसा

तुची माय बाप

गुरु माझा

प्रातःकाळ चरण स्पर्शितो मी तुझे

तुज न हव्यास कसली

घडविती आम्हास 

मनोमनी

तुची दाविती आम्हास 

मार्ग जीवनाचा

प्रथमदर्शी

तुची मायबाप

गुरु माझा

दुसरा म्हणजे

शाळेतील शिक्षक

आहे ज्ञानाचा कळस

ज्ञानरुपी गंगा सागर

म्हणोनी गुरु

एक नव्हे दोन

मी सांगतो गुरु अनंत

पाना फुलांत गुरु

स्त्रुष्टीत गुरु 

नदी नाल्यात गुरु

आकाशी गुरु

भु गर्भात गुरु

प्राणीमात्रांत गुरु

प्रत्येकाच्या ह्रुदयात गुरु

ठायी ठायी गुरु

       


साहित्याला गुण द्या
लॉग इन