STORYMIRROR

Bharati Sawant

Inspirational

3  

Bharati Sawant

Inspirational

सानुली परी

सानुली परी

1 min
857



एकदा एक परी खुप हिरमुसली

चांदण्यांच्या समूहात लपून बसली

समजावयाला गेले चंदामामा

परीने त्यांना लावले कामा

बोलली चांदण्या तुमच्या चमकदार

मला मात्र झेपेना पंखांचा भार

मला सुद्धा चमकायचे आहे

पंखांचे ओझे फेकायचे आहे

चंदामामा ने परीला खूप विनवले

पंखांचे महत्त्वही पटवून दिले

तरी देखील परीराणी ना समजली

पंख फेकून देवुन उडू लागली

पंखाविना धप्पकन खाली पडली

मुळूमुळू रडत घरात गेली

चंदा मामाला तिची दया आली

परिराणीला लिमलेटची गोळी दिली

परिराणी खुदुखुदु हसू लागली


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational