सांज
सांज
सारे झाले कसे स्वार्थी
कोणा ओळखंना कोणी?
फिरले साऱ्या बाजारी मी
नोट घेईना हो का कोणी?
नोटा बदलवू कसे कधी?
रोज माझा तो हो बुडी
हातावरली पोटं आमची
पोरं उपाशी हो पोटची
मुकादम शंभरी देईना
पाचशे कोणी घेईना
चेक देवू का तुम्हाला?
असे कसे हिणवती?
सांज येते दाटून, डोळा पाणी
पाखंर फिरली जाण्या घरटी
काम करून रिकामी ती थैली
पाखरं माझी वाट पाहती घरी
