STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Inspirational Romance

2  

Abasaheb Mhaske

Inspirational Romance

सांग प्रिये...

सांग प्रिये...

1 min
2.8K


सांग प्रिये, असा मी काय केला गुन्हा?

नच दिसे मजला काही अपराधाच्या पाऊलखुणा 

पौर्णिमेच्या चंद्रावाचूनी अस्तित्व कसे चांदण्या?

तुजवाचूनी आसमंत हा सुना सूना... 

सांग प्रिये, खेळ दैवाचा कळला का कुणा?

आस तुझी सखी-साजणी माझ्या वेड्या मना 

प्रीत जडली तुजवरी घडला काय गुन्हा ?

शोधूनी थकलो उत्तर याचे पुन्हा पुन्हा 

सांग प्रिये, होता एक प्रेमवेडा म्हणत

एक तरी आसू मजसाठी ढाळशील का?

कधी तरी तुलाही समजेल भाव माझा मनातला

मी नसेल तेंव्हा शोधशिलंच तु मजजीवना 

सांग प्रिये,  मज र्खोहुदयाच्लया चोर कप्प्यात कोरलेल्या

जीवघेण्या आठवणी तुझ्या कधीतरी मिटवशील का?

सांग प्रिये भावना मनिच्या ओठांवरी तू आणशिल का?

अतूट रेशमीबंध प्रीतीचे नाजुक धाग्यांनी विणशिल का?


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational