STORYMIRROR

Sakharam Aachrekar

Tragedy

3  

Sakharam Aachrekar

Tragedy

सांग आता मला

सांग आता मला

1 min
299

शब्द सोसू किती, सांग आता मला 

गात राहू किती, सांग आता मला


दूर जातेस का तू, मृगजळापरी

साद घालू किती, सांग आता मला


आकळेना तुला, प्रेम माझे सखे

श्वास वाहू किती, सांग आता मला


प्रीत का आपली, आठवेना तुला

खूण दावू किती, सांग आता मला


आणशी तू कधी,या सुखांना सवे

दुःख टाळू किती, सांग आता मला 


प्रीत आहे तुझी अन, अबोला तरी  

मौन पाळू किती, सांग आता मला 


वाट पाहू कशी, माहिती हे जरी

वाट पाहू किती, सांग आता मला 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy