#सामना
#सामना
दिवसांमागून दिवस सरले
सरता सरता वर्षही सरले
सुखदुःखाचेही चालू येणे जाणे
जागवण्या नवी उमेद ,नवी आशा
सज्ज होऊ नव्या जोमाने
समोरील आव्हानांना झेलत
सामना करू ताकदीने
प्रयत्नांचा लावून जोर
वाट काढू हुशारीने
शब्दकोशातून अशक्य शब्द
खोडून काढू हाताने
शर्थ लावू खेळण्या
यश अपयशाचे सामने
लागली ठेच जरी
होऊ आता शहाणे
प्रा. सौ. नलिनी लावरे
