साजणी ... तुला सांगायचे राहून गेले
साजणी ... तुला सांगायचे राहून गेले
साजणी ...
तुला सांगायचे राहून गेले ,
तुझ्या मखमाली स्पर्शाने ,
ऋतु वसंताचे फुलून गेले ,
क्षण प्रेमाचे बहरून आले ...
तुझा डोळ्यांशी लपंडाव ,
खोल गहरे लाघवी घाव केले ,
भळभळून येता शहारे रोमरोमांत ,
काळजाचे तुकडे हजार केले ...
साजणी ...
तुला सांगायचे राहून गेले ...
लपलेली मृगकस्तुरी मनात ,
प्रितीने क्षण जीवनाचे गंधाळले ,
फाया अत्तराचा मनगटावर कशाला ,
तुझ्या आठवांचे सुगंध श्वासात भरले ...
तुझी ओढणी वाऱ्यावरी उडते ,
सवे
मनाने हेलकावे घेतले ,
ती स्पर्श करते असा कोवळा ,
नादावल्या मनाने उसासे भरले ...
साजणी ...
तुला सांगायचे राहून गेले ...
या तापलेल्या जमीनीवरी ,
तु सर श्रावणी म्हटले ,
छळू नको गं नाजूक ,
भरती ओहटीचा चंद्र तु ठरले ...
साजणी ...
तुला सांगायचे राहून गेले ...

