STORYMIRROR

Vikramsingh Chouhan

Inspirational

2  

Vikramsingh Chouhan

Inspirational

साई-प्रतिमा

साई-प्रतिमा

1 min
2.8K


साईंचा महिमा सांगू कुणा, साईंची प्रतिमा दावू कुणा

देवांचा हा देव राया,माझा साई रामा ।।धृ।।

कुणी या न या,या मंदिरी;बाबा धावत गेले हो भक्तां घरी

मनी भाव असूद्या हो साजरी; बाबा करतील भक्तांची चाकरी

ठेवा विश्वास वा नकार, बाबा दावतील दैवी चमत्कार।।१।।

माया किती हो जमविणार; चार दिवसात संपुनी जाणार

काया किती हो झिजविणार, अखेर अंतीं हो वैकुंठी जाणार

ठेवा विश्वास वा नकार, बाबा दावतील दैवी चमत्कार।।२।।

दीप धूप धरू करू वंदन, गाऊ आरती लावूनी मन

करू मंत्र पठन वा स्तवन, पूजाअर्चा करूया भजन

ठेवा विश्वास वा नकार, बाबा दावतील दैवी चमत्कार।।३।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational