साई बाबा!
साई बाबा!
साई बाबा साई बाबा
तुमचा सर्वांवरी ताबा
व्यापीला आपण
अंतरीचा गाभा
सढळ हस्ते
मदत आपली
उद्धारा पायी
अचानक लाभली
गोर गरिबांच्या
सेवेसाठी पहा
सरकारनेही
कम्बर ही कसली
आठवण येता
महिमा पाहून
फोनवरी लिंक पहा
आकस्मिक धावून आली
नमस्कार करण्या
इथूनच मला
संधी आपल्या
कृपेनेच लाभली
साई साई ध्यान
गुंजता मनात
पाहिले मी तुम्हाला
भक्तिभावे अंतरात
आशीर्वाद असू दे
बाबा सदा शिरावर ठेवुनी हात
तुमच्या छायेखाली
फुलून येऊ दे उद्धार जीवनात
नमस्कार हा मनोभावे तुमच्या पायी
लागण्या आपल्या चरणाशी वर्णी
गोड मघुर नारळात पाणी विराजे
साई बाबा ही आपलीच प्रेमळ करणी...!