साहित्य पोवाडा
साहित्य पोवाडा


ओम नमो श्री जगदंबे..
ओम नमो श्री जगदंबे..
नमन तुज अंबे.. करूनी प्रारंभे..
डफावर थाप तुणतुण्याचा..
ओम नमो श्री जगदंबे..
नमन तुज अंबे.. करूनी प्रारंभे..
डफावर थाप तुणतुण्याचा..
शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण..
शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण..
अण्णा भाऊंचे गातो गुणगान हो जी जी..
अण्णा भाऊंचे गातो गुणगान हो जी जी..
सांगली जिल्हा
वाळवा तालुक्याला
मुक्कामी वाटेगावाला
लोकशाहीरांचा जन्म हा झाला.. हो जी जी..
भाऊराव साठे यांच्या घराला..
माता वालुबाईचे पोटी जन्मा आला..
नाव ठेविले तुकारामाला..
प्रेमाने म्हणती सर्व आण्णा… हो जी जी..
चिखलातून कमळ उगवले..
नवतीचे चंदन सुगंध पाझरले..
रानगंगेतून अमृत वाहीले..
त्यांचे चरण मी हो वंदिले.. हो जी जी..
पुढारी मिळाला दलित कामगारांना..
आणि भुकेल्या गुलाम कष्टकऱ्यांना..
आण्णा भाऊंच्या रूपानं..
सुलतान लाभला साहित्यिकांना.. हो जी जी..
असा थोर वारणेचा वाघ..
आला मुंबई नगरात..
गाजला पूर्ण देश विदेशात..
फिरून आला असे रशियात… हो जी जी..
अण्णाभाऊंचं शिक्षण नाही झाले..
दिड दिवस फक्त शाळेत गेले…
जरी शिक्षण त्यांच नाही झाले..
ते चालते बोलते विद्यापीठ ठरले.. हो जी जी..
डोक्यात होता त्यांच्या निखारा..
अंगी भिनला असे फकीरा..
कष्टकरी शेतकरी कामगार..
यांचा होता तो सहारा.. हो जी जी..
आग ओकणाऱ्या पोटांचा..
होता त्यांना अनुभव...
मांडले कथेतून त्यांनी..
दलित कामगारांचे स्वानुभव.. हो जी जी..
लाल बावटा पथक स्थापून..
सरकारी निर्णयांना दिले आव्हान..
दलित कामगार चळवळ उभारून..
फुंकले त्यांच्यात प्राण.. हो जी जी..
माझी मुंबईला विद्रोह केला..
शासना विरुद्ध रान पेटवून..
मुक मिरवणूक काढून..
दिले त्यांनी हे आव्हान.. हो जी जी..
त्यांच्या लेखणीला मिळाली धार..
बाबासाहेबांच्या शिकवणीतून..
लिहिले गंभीर विनोदी लेखन..
त्यातून केले समाज प्रबोधन.. हो जी जी..
अन्याया विरूद्ध बंड उभारणाऱ्या सोबत
होते त्यांची सैर..
भेदभाव करणाऱ्या पिसाळलेल्या माणसाशी
त्यांचे होते हो वैर.. हो जी जी..
रचिले रूपा, वैजयंता, रत्ना
आणि पेंग्याच लगीन..
नाटके, कथा, कादंबऱ्या लिहून..
घडले थोर साहित्यरत्न.. हो जी जी..
त्यांच्या माकडीच्या माळावर
चित्रपट आला डोंगराची मैना..
अशी ही साताऱ्याची तऱ्हा अन्
मुरली मल्हारी रायाची बघाना.. हो जी जी..
ग्रामीण रुढी परंपरांना..
केले हो त्यांनी गजाआड..
अकलेची गोष्ट सांगून..
आवडीने केला खुळवाडा.. हो जी जी..
थोर साहित्यसम्राट महान..
संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांचे योगदान
काय गावी त्यांची नवलाई..
असा क्रांतिकारी पुन्हा होणे नाही.. हो जी जी..
विश्वविख्यात लोकशाहीर साहित्यरत्न..
क्रांतीकारी समाजसुधारक महारत्न..
साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठेंना
सन्मान मिळावा भारत रत्न.. हो जी जी..