साधारणपणे
साधारणपणे
भूतल सारे अंगण झाले होते
त्या अवकाशाशी रण झाले होते
शंभर वेळा रावण ही आलेला
शंभरदा रामायण झाले होते
कौतुक झाले हो प्रतिबिंबांचेही...
घाण कसे ते दर्पण झाले होते
किंमत प्राणांची पण झाली होती
भाव किती साधारण झाले होते
ऐक प्रिये मी 'आग' कशाने झालो
पायच माझे सर्पण झाले होते
कालच अश्रुंनी घर खाली केले
मोहक पूर्वीचे क्षण झाले होते
काय ऋ्तूंची मैफल तू येण्याची
ऊन्ह हिवाळा श्रावण झाले होते ...
घाव स्मृतींनी प्राशन केले होते
फार पिणे त्यांचे पण झाले होते !
निष्प्रभ ती घावांवर झाली अग्नी
निव्वळ ओले ते व्रण झाले होते