Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Suhas Bokare

Others

3  

Suhas Bokare

Others

मनाचिये गुंते

मनाचिये गुंते

1 min
168


तू मला तुझ्या मागे आरशात शोधावे

चूर चूर झालेल्या लाजण्यात शोधावे


पाकळीतले पेले मोगऱ्यातले प्यावे 

गार गार दवबिंदू त्या फुलात शोधावे 


वाढली किती गर्दी हासऱ्या सुगंधांची!

चोरपावलांना त्या हासण्यात शोधावे


आवजावच्या नोंदी कोरल्यात भुंग्यांनी 

स्वर्ण अक्षरी शेरे पाकळ्यात शोधावे


थांबली कुठे आहे आतली धुमश्चक्री.

का उगाच आगीला मी जगात शोधावे?


कोपऱ्यात बुद्धीच्या मोगरा विवेकाचा

तारतम्य थोडेसे कोपऱ्यात शोधावे 


कापडात गुंफीले ते मनाचिये गुंते -

कापडी जरी शेले मोगऱ्यात शोधावे


Rate this content
Log in