Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Suhas Bokare

Romance Tragedy

3  

Suhas Bokare

Romance Tragedy

सडा

सडा

1 min
146


प्रश्न जेव्हा मी निकाली, लागलेले पाहिले 

उत्तरांनी शब्द काही, गाळलेले पाहिले


त्या रिकाम्या वांझ जागा, कोण वाली आमचा 

रंगताना मी तरीही, शाल शेले पाहिले 


ज्या गुलाबाच्या फुलांना, रोज हातांचा लळा 

धुंद वेणीशी नव्याने, वागलेले पाहिले 


ज्या फुलांचे ताटवेही ,ना सुगंधी हासले 

स्पर्श त्यांचे हर्षणारे, नांदलेले पाहिले 


हात ते वाऱ्यात माझे , चिंब का वाटायचे 

त्या सड्याने अंग माझे, तापलेले पाहिले 


वाहत्या वाऱ्यात न्हाली, शांत चिंगारी छुपी

शांत होते शेत माझे, जाळलेले पाहिले 


या अकाली पावसाने, वावराला वेढले 

श्वास माझे चालणारे, बांधलेले पाहिले


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance