Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Suhas Bokare

Abstract Romance Fantasy

4.0  

Suhas Bokare

Abstract Romance Fantasy

मृत शेवट (डेड एन्ड )

मृत शेवट (डेड एन्ड )

1 min
201


कमळा समान तुझ्या कडे चिखलातला जलसा कुठे...

खडका शिवाय कधी तुझा फड रंगतो पळसा कुठे?


घरही प्रिये कुठल्या कुठे पथ संपताच उभे तुझे !

मृत शेवटास असा कुणी प्रिय घालतो वळसा कुठे!?


सुकतो कुठे लवकर घसा रडल्यास तो दुनियेत ह्या 

मदिरालयात सुका हवा रडका नकोच घसा कुठे


जल उपसले वरती कुणी नयनांकडे ह्रदयातले!

'उपसा व सिंचन योजना' शिकतात यार नसा कुठे!


म्हणतात कासव धावला निजला ससा मधल्या मधे 

पण हारल्यावर कासवा रडतो कथेत ससा कुठे?


प्रणयात श्वास विसावतो रस प्यायला अधरातला ...

थबकायला पण श्वास हा तळ ठोकतो सहसा कुठे?


नवख्या घरात मला तुला जर मस्त मस्त रमायचे 

बघतो जरा मिळतोय का वरचा पगार कसा कुठे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract