सोमरस
सोमरस
1 min
123
ह्रदयाला माझ्या झरा वाटलो मी
....ओल्या ओठांना बरा वाटलो मी
लोणी वाटावी अशी रात्र गेली
अंधारालाही सुरा वाटलो मी
'ताडी' मी झालो तिच्या कारखानी
राती छमियेला 'निरा' वाटलो मी...
लोकांच्या लेखी अनाचार झाला !
पाप्यांना पापी खरा वाटलो मी...
आयुष्याने खो दिला लालसांना
वेळेला माझ्या पुरा वाटलो मी