STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

4  

Manisha Awekar

Abstract

साद निसर्गाची

साद निसर्गाची

1 min
279

खळखळ वाहणारा

शुभ्र शीतल प्रपात

वृक्ष वल्ली बहरल्या

येई निसर्गाची साद


साज हिरवा लेऊन

वसुंधरा नटलेली

फळफुले भारलेली

भेटीलागी आतुरली


राने गर्द हिरवाई

मळा रंगीत बहरे

जणू निसर्ग खुणावे

जगी सौंदर्य बघ रे


सूर्य वर्षा थंडी वारा

निसर्गाची रुपे नाना

प्रेम अर्पूनी जगाला

सख्या खुलव जीवना


नको मानवा तू व्यर्थ

जीवनास गमवावे

निसर्गाला मनोभावे

प्रेम सदैव अर्पावे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract