रविवार....
रविवार....
रविवार सुंदर सुप्रभात...!
र मणी मन हंसा नर..गाणे
वि मनस्क असताना कानी पडले
वा टले काय ते शब्द काय त्या भावना
र सरसते जीवन जगण्याची उर्मी...
सुं दर जीवन फक्त सिनेमात
द मदार जीवन फक्त ईतिहासात
र डके जीवन मात्र प्रत्यक्षात
सु चत नव्हते काही त्या क्षणात...
प्र सन्नताच हरवली जीवनातली
भा ळीचे भाग्यच निमाले
त गमग मात्र भारून राहिली
म्हटले हे देवा जीवन कसले...?
तसा तो क्षणात हसला
आणि मायेने म्हणाला
अरे आनंदी प्रसन्न जीवन
हे अंतर्मनाच्या उर्मीचे फलित आहे
उठ झटकून टाक सारे
कालचा दिवस आज नाही
उद्याचा दिवसही आज नाही
वर्तमानात आंनदी रहात जा....
बघ जरा माझ्या कडे
कितीही अडसर आले तरी
मी माझ्याच तेजाने तळपतो
याला स्वावलंबी जीवन म्हणतात....
स्वावलंबनात आनन्द आहे
अंतर्मनाचे ओतप्रोत तेज आहे
तेजात सौख्य समाधान आहे
समाधानातच खरी शांती आहे....
म्हटले देवा खरे आहे
उठलो मी ही स्वतःच्याच उर्मीने
स्वीकारले सारे पुन्हा नरमीने
आणि पुन्हा पाऊल टाकले
मोठ्या पुढे गुर्मीने....!
