STORYMIRROR

Shila Ambhure

Inspirational

3  

Shila Ambhure

Inspirational

रुसुबाई

रुसुबाई

1 min
1.3K



गुमसुम गुमसुम

का गं अशी बसलीस?

भरले का रागे कुणी

का गं बाई रुसलीस?


दादाने आणले बघ

चॉकलेट छान गोड

ताईनेही केला पुढे

बाहुल्यांचा एक जोड

बघते ना तरीही तू

का गं गप्प राहिलीस?


बाबा म्हणतात तुला

मी गं बागेत नेईन

आजोबा बोलती

कडेवर मी घेईन

उठुनिया गेली दूर

शब्द नाही बोललीस.


आजीनेही दिला खाऊ

तोही नाही चाखलास

घरभर खेळणी ती

पसारा का टाकलास?

गोड पापी घेता आईने

खुदकन हसलीस.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational