रंगबरसे, रंगपंचमी
रंगबरसे, रंगपंचमी
पुन्हा एकदा आली रंगपंचमी
वेगवेगळ्या रंगात सजलेली
अनेेेकानेक
नात्यात भिजलेली
या
रंगात एक रंग
मैत्रीचा मिळवू या
चला
मैत्रीची रंगपंचमी खेेेळू या
आली
रंगपंचमी
करीत रंगांची उधळण
प्रेमाचा रंग घेऊन
रंगवू अशी एक शिंपण
प्रेमरूपी गुलालाची
चला
करुया उधळण
एक रंग
विश्वासाचा
चला आज मिसळून
सारे मतभेद
एकमेकातील विसरून
घालून मनात नात्यांची
नवी
गुंफण
चला
मनसोक्त रंगवून
टाकू आपले
प्रियजन
आज
नव्याने
भिजू या रंग
आणि
स्वछंद अंग
जिवन करूनी
अवघे दंग
उठु द्या मनी
रंगतरंग
पुन्हा एकदा आली रंगपंचमी
असे
उधळू या आज हे रंग..
