STORYMIRROR

Deepali Mathane

Fantasy

3  

Deepali Mathane

Fantasy

रंग उषेचे

रंग उषेचे

1 min
245

झेप घेऊनी आकाशी

क्षितिजाच्याही पार झेपावे

आकाक्षांचे पंख पसरूनी

नभोदयाला प्रतिक्षण टिपावे

   हात तुझा मग घेऊनी हाती

  सुखस्वप्नांचे केशरसडे शिंपावे

  दूर सारूनिया तिमिराला

  प्रकाशकिरणांशी जिंकावे

उदयातील स्वप्नांवरती घाला

अचाट सामर्थ्याने उभे रहावे

वाटेतील अडथळ्यांचे कुंपण

हसता-खेळता पार करावे

   पथदर्शक हे दिवे जे दिसती

   यश मार्गक्रमणात त्यासही घ्यावे

   एक-एक पाऊल टाकूनी पुढती

   यश अमृताचे रसपान प्यावे

सुवर्णमयी नक्षत्रांच्या वेलींनी

जीवनी अपुल्या सदा बहरावे

धुंद मोहक सुगंध झेलीत

दुःखाग्नितील क्षण हे विसरावे

  भास्कराने विखुरले रंग उषेचे

  निशेचे सावट दूर करावे

  घारीसम झेपावूनी पहाटेस

  जीवनी उदयाचळीचे रंग भरावे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy