रंग नवरात्रीचे
रंग नवरात्रीचे
आली नवरात्री
झाली घटाची स्थापना
करू उपासना
दुर्गेची.
नंदादीप शांत
धूप -दीपांचा दरवळ
फुलांचा परिमळ
अखंडित.
माळ रोज
नवी पाना -फुलांची
शोभा घटाची
विशेष.
सप्त धान्ये
पेरू घटाच्या मातीतून
बघती डोकावून
कोम्ब.
रुपे देवीची
दुर्गा ,काली, अंबिका
भवानी, चंडिका
कित्येक.
भरुया परडी
पीठा-मिठाचा मान
नैवेद्य छान
आवडीचा.
लेऊनि साज
घेऊनि शस्त्र हाता
सज्ज भवानीमाता
संहारा.
रंग नवरात्रीचे
उपवास, जपतप, नेमधर्म
नाना भक्तीकर्म
देविठायी.