रंग मैत्रीचे
रंग मैत्रीचे
निखळ मैत्रीचे नाते असावे
शुभ्र चांदणे जीवनात यावे
मोरपंख फिरून मैत्रीचे
रेशमी बंध बांधूया नात्याचे
मन पाखरू होऊन उडावे
मैत्रीचे रंग उजळावे
मैत्रीचा उत्सव असा साजरा करावा
प्रत्येक दिवस सप्तरंगी असावा
लाखात नाते एक मैत्रीचे
सुवर्ण रंगी मन जसे
मैत्रीचा ऋतू असा यावा
बहर त्याचा कायम राहावा
मैत्रीचे क्षण असे असावे
सजवित जीवन जावे
गुलमोहर मैत्रीचा सदैव फुलत रहावा
आठवणींचा साठा साठवत जावा
फुल फुलावे असे
त्यावर रंग मैत्रीचे जसे
थेंब-थेंब बरसावे असे
त्यात गंध मैत्रीचे जसे
