STORYMIRROR

kishor zote

Inspirational

4.5  

kishor zote

Inspirational

रंग जीवनाचे ( सहाक्षरी )

रंग जीवनाचे ( सहाक्षरी )

1 min
1.9K



रंग जीवनाचे

या चला लुटूया

रंगात त्याच हो

रंगून जाऊया


मिळाले जीवन

आनंद घेऊया

आनंदाची मग

देव - घे करूया


प्रेम द्यावे प्रेम

त्यातच न्हाऊया

प्रेमानेच मग

ते जग जिंकूया


सत्य मार्गावर

अखंड चालूया

ते सत्य वचने

सदाच बोलूया


वेदना कधी ना

कोणास देऊया

त्रास होईल ते

करणे टाळूया


वाद नको सदा

संवाद करूया

शब्द शब्द असे

सुखाने नांदूया


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational