रात्र पौर्णिमेची
रात्र पौर्णिमेची


( लीनाक्षरी )
।। रात्र पौर्णिमेची ।।
रात्र पौर्निमेची सात रे दुधाची
आटवून दूध गोडी अमृताची ||१||
चंद्र पुनवेचा गोल गोल दिसे
मनी भरोनिया स्वप्नात रे दिसे ||२||
रात्र चांदण्याची माझ्या घरी दारी
जागवून रात करी कोजागिरी ||३||
लपे ढगा आड चंद्र पौर्णिमेचा
मंद झाला प्रकाश हा चांदण्याचा ||४||
सारे जमवून करुया वर्गनी
कोजागिरी साजरी केली सर्वांनी ||५||
उगवली आज पौर्णिमेची रात
नभी सजल्या चांदण्या प्रकाशात ||६||