राष्ट्रमाता जिजाऊ
राष्ट्रमाता जिजाऊ
स्वराज्य रक्षिण्या घडविले शिवबाला
त्रिवार वंदन माझे राष्ट्रमाता जिजाऊला
जोपासून स्वराज्य हित तळपली तलवार
चालून आलेल्या शत्रूवर केला तिने प्रहार
उजाडलेल्या धरित्रीची वाढविली शान
महाराष्ट्र घडवून उभारला नंदनवन
कधी डगमगली नाही उभी राहिली खंबीर
आदर्श माता अशी ती रणांगणातील वीर
जननी अशी ती मायेचा सागर
रुजविले शिवबात तिने थोर संस्कार
मराठी मातीचा वाढविला स्वाभिमान
लेकरे तुझ्या कर्तुत्वाची आज गाती गुणगाण
