STORYMIRROR

Shila Ambhure

Inspirational

5.0  

Shila Ambhure

Inspirational

रानगंध

रानगंध

1 min
374




रम्य एका सायंकाळी

गेले होते वनामध्ये

ठाण मांडूनि बैसला

गंध एक मनामध्ये.


वाटू लागला हवासा

गंध रानातला खास

रातभर निजेतही

होऊ लागला तो भास.


शोधावया गेले पुन्हा

एकटीच मी रानात

ऐकावया आली गोड

कुजबुज ती कानात.


रानफूल सान एक

बाजूलाच होते गडे

दिसताच मी बावरी

झेपावले मजकडे.


बोलू लागले हळूच

मीच असे रानफुल

धुंद माझा रानगंध

तुला पाडतो गं भूल.


उग्र जरी हा सुवास

त्याचा निराळाच थाट

रानगंधी गंधाळली

रानातली पायवाट.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational