पुण्यश्लोक सावित्री... वटपोर्णिमा
पुण्यश्लोक सावित्री... वटपोर्णिमा
वटवृक्षाची घनदाट सावली
पतीचे प्राण परत आणणारी धन्य ती माऊली
काय असेल तिच्या पुण्याचा मोठा साठा
वटवृक्षाची पूजा करून साठवला सौख्याचा वाटा
जन्मांतरीची साथ मागून घेतले
तिने सुताचे सात फेरे दृढ पतीपत्नीचे नाते केले
नैवेद्य केला आमरस पुरणपोळी
अखंड सौभाग्याचे वाण मागितले वेळोवेळी
अशी ही सत्यवान सावित्रीची प्रेमकथा
युगानुयुगे गायिली जाते ही गाथा॥