STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Romance Inspirational Others

1  

Abasaheb Mhaske

Romance Inspirational Others

पुन्हा नव्याने...

पुन्हा नव्याने...

1 min
3.1K


संसार, प्रपंच सांभाळता 

दिवस कसे सरत गेले ...

कळलेच नाही ग तुला - मला 

मनासारखे जगण्याचेच राहून गेले 

तू होतीस ग थोडीशी हट्टी

मीहि होतोच अभिमानी  

तुही चुकलीस थोडी थोडी 

माझंही चुकलंच थोडंसं

पंख फुटता पाखरे सारी 

केव्हाच बघ पसार झाली 

उरलो आता तू अन मी 

उरल्यात फक्त आठवणी 

दिवस होते ते मंतरलेले , नव्या नवलाईचे आठव पाहू 

तू होतीस लाजरी - बुजरी , मी होतो गोंधळलेला..

खोटं -खोटं का होईना पण म्हण सखे , तू मला आवडतो

मी हि तुला तसंच म्हणेन नकळत थोडंसं जवळ येऊ ...

झालं ते झालं पुन्हा नव्याने सुरुवात करू

क्षणभर का होईना सार सार विसरून जाऊ 

तुझं ठेव तुझ्याजवळ , माझं असू दे माझ्याजवळ 

थोडं- थोडं जवळ येऊ , एकरूप होऊ पुन्हा नव्याने...

 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance