पुन्हा नव्याने एक होऊ
पुन्हा नव्याने एक होऊ
चला गड्यानो ! पुन्हा नव्याने एक होऊ
मना - मनात मानवतेची ज्योत पेटवू
धर्मांधता, जातीयतेला जिवंत गाडू
पुन्हा नव्याने अखंड भारत साकारू
चला गड्यांनो ! मानवतेचा झेंडा रोवू
अमर शहिदांचे स्वप्न साकारताना पाहू
धर्माचा ना पंथाचा मी फक्त भारतीय म्हणू
एकच ध्यास, सगळ्यांचाच विकास प्रत्यक्षात आणू
चला गड्यांनो ! सविनय चळवळीची वेळ आता आलीय
आधीच खूप झालाय उशीर, आणखी व्हायला नकोय
अंधार खूप झालाय सर्वकंष क्रांतीच्या पेटवा मशाली
हरितक्रांतीचे स्वप्नांची पूर्ततेने नांदेल इथे खुशहाली
चला गड्यांनो ! पुन्हा नव्याने माणुसकीची जोडुया नाती
आशेच्या या क्षितिजावरती आकांक्षाची तारे विसावती
विसरुनी सारी व्यर्थ भ्रमंती, समृद्ध बनवूया संबंध धरती
मानवतेचे सैनिक आम्ही झेप घेऊया गगनावरती ...
