पुंडयुग
पुंडयुग
निखारे सुखांचे निघाले, धरू.
कशाला विषाचेच प्याले धरू?
किडे फासलेली, तुझी भाकरी.
...किडे राजनीतीचवाले धरू.
असामान्य चावी मला दावली .
नि हातात सामान्य ताले धरू!
जळालेत ओलेच, ते घोसुले
नितीचे तुझे हे, हवाले धरू.
तिथे काय होते, मला सांगना.
असे मी विचारून, झाले धरू.
समाधान माझ्या, मनाला असे.
जवाबात माझी, सवाले धरू.
धरा पाहता मी, स्मरावे फुलं.
मुठीतं श्रमांचे , गुलाले धरू.
शलाका हिरव्या, तृणांच्या सरी.
धरेच्या पहाऱ्यात, भाले धरू.
खरे काय सांगायचे, तू कुठे.
गटारात नाही त, नाले धरू.
जगण्यास आहे , हिशोबीच मी.
हिशोबात लोचे निघाले धरू.
युगाला सपूतेच गुंडे हवे.
कली भोवती तेच आले धरू.
खरा गुंड आहेस ख्याती तुझी !
क्षमा मागतो, राव भ्याले धरू.
कमी बावळे माझिया सारखे
अशांना निकामीच साले* धरू.
(* मेहुणे )
