पुढे पुढेच जायचे
पुढे पुढेच जायचे
कर्तृत्वाने सदा पुढे
कार्यभार सांभाळते
नित्य नवीन क्षेत्रात
नवी उर्मी उसळते (१)
भेदभाव नाही कधी
नाही कुणी सान थोर
समानता सर्वांभूती
मदतीचा हातभार (२)
प्रगतीने सकलांनी
पुढे पुढेच चालावे
सदा पवित्र उद्दिष्टे
कार्य करीत रहावे (३)
केल्या कार्याची पावती
नको मजला कशाची
चित्रगुप्त लिहीतसे
नोंद ती भल्या बु-याची (४)
सत्कार्याचे फळ मिळे
नसे लाडका दोडका
समजले जगताला
आज उंच माझा झोका (५)