STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract Inspirational

3  

Manisha Awekar

Abstract Inspirational

पुढे पुढे चालावे

पुढे पुढे चालावे

1 min
196

वर्तमान सदा जाण

नको बघणेच मागे

भूतकाळ सरलेला

पुढे पुढेच चालावे    (1)


अगणित चुका होती

बालपणी न मोजावे

नको उजळणी मागे

पुढे पुढेच चालावे   (2)


शब्द ओठांवरी येती

निसटती वायुवेगे

पुन्हा नच मागे येती

पुढे पुढेच चालावे   (3)


चुके मार्ग जीवनात

दिशावेगळीच मिळे

नवा मार्ग सापडता

पुढे पुढेच चालावे    (4)


जवळची प्रिय व्यक्ती

कधी चुकून दुखवे

क्षमा तत्काळ करुनी

पुढे पुढेच चालावे   (5)


जीवनाचे सूत्र सांगे

नच माघारी यायचे

मार्ग खुला पुढलाची

पुढे पुढेच चालावे   (6)


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract