पतंग (बालकविता)
पतंग (बालकविता)


यारे गाड्यांनो यारे या
पतंग उडवू सारे चला
राजू आला गण्याही
आला गाणी गाऊन चाले.।।।१।।।
पतंग जाई आकाशात
भरभर वारा येई सरसर
उंच उंच झोका घेत
आकाशाला गवसणी भर.।।।२।।।
मज्जा येई जेव्हा दुसऱ्याची
पतंग कापी सरसर खाली
येई जशी विमान उतरी
जाऊन जाऊन कुठे जाशील.।।।३।।।
निळेभोर आकाश गवसणी
घाल आकाशी फिरून
फिरून दमली चोही दिश्या
करू स्वागत धरून.।।।४।।।
पतंगाची आहे स्वारी
घेऊ उंच आकाश भरारी
कटी पतंग दुसऱ्याची
मजा येई मुरारी.।।।५।।।