बालपणीच्या सुखद आठवणी
बालपणीच्या सुखद आठवणी
रम्य ते बालपण अगदी स्वच्छंदी आणि निरागस ते मन
प्रफुल्लित आणि आनंदी
ते वातावरण
कधी गोंडस हसू तर कधी खट्याळपणा
हसत खेळत निघून जायचा प्रत्येक तो क्षण
खेळ असायचे कितीतरी लगोरी
लंगडी कधी डोंगर का पाणी
ना आजची काळजी ना उद्याची चिंता कसली
शुभ्रधवल रंगासारख निर्मळ असे मन किती ते बालपणी
इवल्या-इवल्या पावलांचे कधी मोठे झाले ठसे
बालपण ते आता वाटते विसरू तरी कसे..?
आठवण झाली आज त्या निरागस बालपणाची
निरनिराळ्या गंमतीची आणि रंगीबेरंगी खेळांची
मनात साठवायच्या बालपणीच्या
त्या सुखद आठवणी अशा कितीतरी
आयुष्यभर आपल्याजवळ असते ही गोड शिदोरी
हरवले ते दिवस
आणि हरवल्या त्या
बालपणीच्या सुखद आठवणी
नाही येणार कधी त्या परतूनी
आपल्या आयुष्याचे हेच असतात क्षण सोनेरी..
