बालपण
बालपण
1 min
256
मिणमिणत्या प्रकाशात माझ
बालपण मला आठवतय....
खळखळणारं निरागस हासु
चेहऱ्यावर पुन्हा गुंजतय.....
भिरभिरनाऱ्या वाऱ्यात ते स्वच्छंदी
पणे बागडतयं.....
मुसळधार पावसाच्या सरीत ते
चिंब भिजतय.....
कधी हसणारं कधी रडणारं ते
सैरभैर धावतय .....
जुन्या आठवणींचा पिटारा ते
आज उलगडतय .....
बालपण मागे सुटता जवाबदारीच
ओझ जाणवतयं.....
बालपणीच्या आठवणींनी नकळत
डोळ्यात आज पाणी साठतयं....
