अंधार
अंधार
अस्ताला हा सूर्य ही गेला
आभाळ झाले रिकामे
रात ही अमावस्येची
सोबतीला ना चंद्र ना चांदणे
अंधारले आहे सभोवती
मार्ग ही गुप्त होऊन गेला
काजव्यांनी साथ ही सोडली
घाव दिले काट्याने
हृदयाला जखम ही झाली
अश्रूंनी मग मार्ग मोकळा केला
अंधारल्या रात्रीत तो
आक्रोश लुप्त झाला
हरवूनी जाता वाट अशी
हाक देण्या कोणी नसे
भास होती मनाला
आजुबाजू कोणीतरी दिसे
साद कुणा द्यावी
कुणी नसे साथीला
जो तो आपल्या मार्गाला
सारे हरवून उरले आता अंधारी जगणे

