STORYMIRROR

Umendra Bisen

Children

3  

Umendra Bisen

Children

आठवणीतले बालपण

आठवणीतले बालपण

1 min
264

काळ तो बालपणीचा

होता अनंत सुखाचा

असे प्रत्येक त्यावेळी

राजा आपल्या मनाचा!


घेत असतो आनंद

खऱ्या सुखी जीवनाचा

त्रास नाही कुठलाच

दुःख आणि वेदनेचा!


जणू बालपण असतो

जरा मोकळ्या मनाचा

जरी आलाच का राग

असे तो काही क्षणांचा!


इच्छा आकांक्षांना कधी

नसे बंधन कुणाचे

हवं जर काही त्याला

असे अट्टाहास त्याचे!


काळ तो बालपणीचा

असे तो खेळीमेळीचा

नसे कसलाही स्वभाव

राग द्वेष भावनेचा!


खेळ खेळावं नेहमी

असे हवे बालपण

व्हावा आनंदीत मन

यावा परत तो क्षण!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Children